मुंबई

Bambu Farming: बांबू प्रकल्पातून २५० कुटुंबांना मिळाला रोजगार; १९ एकरात बांबूलागवड

CD

Bambu Farming: जव्हार तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. दुर्गम भागामुळे शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, केवळ हंगामी रोजगार, कुपोषण, स्थलांतर, गरिबी अशा सगळ्याच समस्या आ वासून उभ्या आहेत; मात्र यावर उपाय म्हणून या भागात काही सामाजिक संस्था लोककल्याणासाठी कामे करीत आहेत. त्यातून काहीशा प्रमाणात येथील जीवन सुलभ होण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात रामनगर येथे १९ एकरात बांबूलागवड करण्यात येणार असून २५० कुटुंबांच्या हाताला काम मिळणार आहे.

केशवसृष्टी संस्थेच्या या उपक्रमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच यातून महिला स्वावलंबी होणार आहेत. यातून त्यांचे आर्थिक नियोजन सुधारण्यास हातभार लावला जाणार आहे. या प्रकल्पात सद्यस्थितीत जवळपास १९ एकर जागेत विविध पाच जातींच्या ५० हजार बांबूंची लागवड करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक महिलांना उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल माफक दरात गावातच उपलब्ध होणार आहे. त्यांना या उद्योगातून मिळणाऱ्या नफ्यातही वाढ होणार आहे. गावातच रोजगार निर्माण झाल्याने होणारे स्थलांतर थांबेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बांबू प्रकल्प उद्योगातून दिवाळीत लागणारे आकाश कंदील, सुबक राख्या, विविध प्रकारचे ट्रे, सुशोभीकरणाच्या आकर्षक वस्तू, अनेक प्रकारच्या ट्रॉफी यासारख्या पूर्णपणे नैसर्गिक वस्तू तयार करून महिला वर्गाला अर्थार्जनाची प्राप्ती होणार आहे. सध्याच्या स्थितीत जवळपास २५० पेक्षा जास्त कुटुंबांत या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्षपणे महिला या वस्तू बनवत आहेत. या भूमिपूजन सोहळ्यात भांगरेपाडा येथील तारपा नृत्य व हाडे येथील टिपरी नाच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

केशव सृष्टीच्या लाभदायी प्रकल्पामुळे ग्रामीण महिलांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. बांबू प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला बांबू उद्योग समूहाचे गौरव श्रीवास्तव, केशव सृष्टी ग्रामविकास प्रकल्पाचे सर्वेसर्वा विमलजी केडिया, मुंबई युवा जव्हार केंद्राच्या पालक प्रमिला कोकड, बांबू महिला कंपनीच्या नमिता भुरकुड व सहकारी तसेच महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT