मुंबई

पोलिस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

CD

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : माणकोली-दापोडा मार्गावर चोरटे अंगावरील सोने लुटून नेत असल्याचे सांगून तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणकोली भागात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील माणकोली गावाजवळ लोढा अप्परच्या कटियारा इमारतीमध्ये राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी नीळकंठ गंगाधर वेश्‍वीकर हे बुधवारी (ता. २२) पेट्रोल संपल्याने पेट्रोल घेण्यासाठी त्यांच्या स्कूटरने गजानन पेट्रोल पंपाकडे जात होते. त्या वेळी पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या दोन व्यक्तींनी पोलिस असल्याचे सांगून त्यांना थांबवले. पुढे रस्त्यात चेन स्नॅचिंग होत आहे, त्यामुळे गळ्यात घातलेली चेन व अंगठी काढून कागदात ठेवा असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या नीळकंठ वेश्‍वीकर यांनी सर्व दागिने काढून कागदात ठेवायला पोलिसांकडे दिले. त्यानंतर भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून चतुराईने दगडाचे खडे दुसऱ्या कागदात गुंडाळून दिले. त्यानंतर खरे दागिने घेऊन दोघांनीही पळ काढला. याप्रकरणी वेश्‍वीकर यांनी ६५ हजार रुपयांचे दागिने तोतया पोलिसांनी पळवल्याची तक्रार नारपोली पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasha Mukt Yuva For Viksit Bharat : ड्रग्सविरोधात देशव्यापी अभियान; पंतप्रधानांचे तरुणांना आवाहन, म्हणाले- व्यसन स्वप्न उद्ध्वस्त करते

Dombivli: डोंबिवलीकरांसाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय, रो-रो सेवा सुरू करणार, कधीपासून? महत्त्वाची माहिती समोर

Abhijit Dipkeच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह? RTI कार्यकर्त्याची तक्रार, दीपकेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन स्थलांतरित मजुरांच्या हत्यांना जबाबदार कोण? फारुख अब्दुल्लांचा सवाल

Sakal Foundation Day: शेती-उद्योगांच्या संतुलनातून शाश्वत विकास शक्य : प्रा. एस. महेंद्र देव; ‘सकाळ’चा ४६ वा वर्धापन दिन दिमाखात

SCROLL FOR NEXT