मुंबई

मुंबई-पुणे दरम्यान मेल एक्सप्रेस रद्द

CD

मुंबई-पुणेदरम्यान मेल-एक्सप्रेस रद्द; प्रवाशांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : लोणावळा-पुणे विभागातील खडकी-शिवाजीनगरदरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवार-रविवार ब्लॉक घेतला होता. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द केल्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि पर्यटकांची मोठी गैरसोय झाली.

लोणावळा-पुणे विभागातील खडकी-शिवाजीनगरदरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी रात्री १०.२० वाजल्यापासून ते रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमुळे शनिवारी आणि रविवारी दोन दिवस मुंबई-पुणे-मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही गाड्यांच्या मार्गात आणि वेळेत बदल करण्यात आला होते. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. विशेष म्हणजे चौथा शनिवार-रविवार आणि गुरु नानक जयंतीची अशी सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे अनेकांनी मुंबई बाहेर जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, ब्लॉकमुळे मुंबई ते पुणे दरम्यानच्या रविवारी इंटरसिटी, डेक्क क्वीन, सिंहगडसह कोयना एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द केल्या होत्या. परिणामी प्रवाशांना एसटी बस, खासगी वाहनातून रस्ते मार्गाने प्रवास करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT