मुंबई

शहीदांच्या स्मरणार्थ कल्याणमध्ये मॅरेथॉन रॅली

CD

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : संविधान दिन आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ कल्याणमध्ये मॅरेथॉन रॅली काढण्यात आली होती. कल्याणच्या शिवाजी चौकात एटीएसचे माजी पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी, इंटकचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश मुथा, कमलादेवी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सदानंद तिवारी, कल्याण जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप, उद्योजक मनीष मुथा, डॉ. दौलतसिंग पालीवाल, सीए अन्वेषा मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल प्रज्वलित करून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

सर्वप्रथम शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी पालीवाल यांच्या हस्ते शहीद आणि देशाचा अभिमान अशा संदेशांनी भरलेले फुगे सोडण्यात आले. शहाड येथील साई निर्वाण संकुल येथे मॅरेथॉनचा ​​समारोप झाला. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सपना गादिया, लेफ्टनंट विनीता हुबळीकर, सुमित पालीवाल, जयदीप सानप, बाला बर्वे, मंगलसिंग चौहान, संजय सविंदर आणि डीबीएस शाळेचे संचालक मनोज सिंग आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT