मुंबई

ठाण्यात २७ दिवसांत ९७ आगीच्या घटना

CD

ठाणे, ता. २८ (वार्ताहर) : ठाण्याच्या विविध प्रभाग समितीत विविध कारणास्तव लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे; तर नोव्हेंबर महिन्यात २७ दिवसांत तब्बल ९७ आगीच्या घटना घडल्या आहेत; तर यामध्ये तीन जण किरकोळ जखमी झालेले आहेत; तर दोन वृद्धांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आगी लागतात कशामुळे, याबाबत अनभिज्ञता असली तरीही बहुतांश आगी या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

नोव्हेंबरच्या २७ दिवसांमध्ये ठाण्यात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडलेल्या आहेत. एसी युनिटला आग लागणे, कचरा पेटणे, विद्युत मीटर बॉक्सला आग लागणे, सिलिंडर गळतीमुळे आग, सिलिंडरचा स्फोट होणे अशा विविध प्रकारच्या घटना शहरात विविध ठिकाणी घडल्या आहेत. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाल्याचे समोर आले आहे; तर नुकत्याच घडलेल्या मुंब्रा येथील केमिकल स्फोटाच्या घटनेत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली; तर ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाघबिळ परिसरातील बंगल्यात राहणाऱ्या परिवारातील वयोवृद्ध दाम्पत्य आगीत गुदमरल्याने बेशुद्ध झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची गंभीर घटना घडली.

नोव्हेंबर महिन्यात ठाणे पालिका क्षेत्रातील विविध प्रभाग समितीत लागलेल्या आगीत तीन जखमी आणि २ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे; तर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक आगीच्या घटना या १२ नोव्हेंबरला घडल्या आहेत. या दिवशी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नोंद केलेल्या आगीच्या सर्वाधिक घटनांचा आकडा १५ एवढा होता; तर त्याखालोखाल १३ नोव्हेंबरला १० आगीच्या घटना घडल्या आहेत; तर १४ नोव्हेंबला आगीच्या ९ घटना घडल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT