कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील कल्याण मुरबाड रोड राष्ट्रीय महामार्ग-६१ लगत असलेल्या हॉटेल्स आणि लॉन्समुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या हॉटेल्स आणि लॉन्समुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच येथे मोठ्या आवाजात डीजे लावला जात असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निकेश पावशे यांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कांबा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गलगत विविध हॉटेल्स आणि लॉन्स आहेत. याठिकाणी नेहमीच कार्यक्रम चालू असतात. हे कार्यक्रम सुरू असताना महामार्गावर बेकायदेशीर अनेक वाहने पार्क केली जातात, परिणामी या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच येथे पार पडणाऱ्या कार्यक्रमांमध्ये फटाके, बॅन्ड, डीजे वाजवून मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत आहे. तसेच या हॉटेल्समध्ये वेळेचे बंधन पाळले जात नाही. परिणामी याचा त्रास परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांना होत आहे. या संदर्भात अनेक वेळा हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधून हे प्रकार थांबवण्याची विनंती करण्यात आली, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे निकेश पावशे यांनी सांगितले.
…..
नियमांची पायमल्ली
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. या हॉटेल्स आणि लॉन मालकांकडून नियम धाब्यावर बसवून व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे अनेक गैरकृत्य करणाऱ्या या हॉटेल्स आणि लॉन्सवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निकेश पावशे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
…..
लवकरच कारवाई
टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी या संदर्भात सांगितले की, कारवाईबाबत पत्र प्राप्त झाले की, त्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.