मुंबई

वाचनाची आवड उपजत असावी लागते

CD

कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : वाचनालय ही एक वेगळी संस्कृती आहे. असे असले तरी वाचनाची आवड उपजत असावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे यांच्या कन्या ज्येष्ठ साहित्यिका स्वाती चांदोरकर यांनी केले. त्या सार्वजनिक वाचनालय कल्याणने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.
सार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पु. भा. भावे व्याख्यानमालेअंतर्गत संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या वेळी स्वाती चांदोरकर यांच्यासह अॅड. बी. टी. खरात, वाचनालयाच्या चिटणीस आशा जोशी, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक, ग्रंथपाल गौरी देवळे आणि वाचकवर्ग उपस्थित होता. या वेळी कवी किरण फाटक यांनी लिहिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गीतांजली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. स्वाती चांदोरकर यांनी स्वतःच्या आयुष्यातील मजेदार किस्से सांगून कार्यक्रमास रंगत आणली. अॅड बी. टी. खरात यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व विशद केले. तसेच संविधानाची निर्मिती कधी झाली, त्यासाठी किती कालावाधी लागला, सदस्य कोण होते याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक वाचनालय कल्याणने राज्य पातळीवर आयोजित केलेल्या कथा, काव्यलेखन स्पर्धेचा बक्षीस समारंभ व वाचकांसाठी आयोजित केलेल्या पुस्तक रसग्रहण व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रसंगी स्पर्धेचे परीक्षक साहित्यिक नारायण लाळे, दीप्ती जोशी, प्रा. वृषाली विनायक, सुवर्णा जाधव यांनी परीक्षणाची मोलाची कामगिरी केली व यथोचित मार्गदर्शन केले. वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी प्रास्ताविक करताना वाचनालयाने केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
…..
विजेत्यांचा गौरव
कार्यक्रमात कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीपाद टेंबे, द्वितीय विलास गावडे; तर प्रदीप बडदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. काव्यलेखन स्पर्धेतील प्रथम जयश्री कुलकर्णी, द्वितीय गायत्री खराटे, तृतीय अर्जुन जाधव; निबंध लेखन स्पर्धेतील सार्थक परब (प्रथम), कौस्तुभ ओक (द्वितीय), मधुरा कुलकर्णी (तृतीय) यासह पुस्तक रसग्रहण स्पर्धेतील विजेते साक्षी कांबळी, किसन मोरे, जया पाटील यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT