मुंबई

डोंबिवलीत रंगली बुद्धीबळ स्पर्धा

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने आयोजित बुद्धिबळ स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला आहे. मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते आणि डोंबिवलीतील सुयोग मंगल कार्यालयाचे संचालक दिवंगत दर्शन निमकर यांच्या स्मरणार्थ या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेत १८० स्पर्धकांनी भाग घेत भरघोस प्रतिसाद दिला. सुयोग मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा पार पडली.
ठाणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या संलग्नतेने गेले १४ वर्षे ही स्पर्धा मंडळाच्या वतीने भरविली जात असून यंदाचे स्पर्धेचे १५ वे वर्ष आहे. यंदा सकाळ आणि दुपारच्या सत्रात एकूण ८ गटात ही स्पर्धा पार पडली. यात ७, ९, ११ आणि १३ वर्षाखालील गटात ९४ स्पर्धेत तर ८, १०, १२ आणि १५ वर्षाखालील गटात ८८ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक गटातील सर्व स्पर्धकांना सर्व फेऱ्या खेळण्याची संधी देऊन सर्व फेऱ्यांमधील अव्वल १० मुलांना आणि ५ मुलींना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे मार्गदर्शक हरी वैशंपायन, चेस असोसिएशनचे डॉ. तांडेल, मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे, माजी अध्यक्ष नंदन दातार, स्पर्धा प्रमुख प्रथमेश जोशी यांसह इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
...
स्पर्धेचा निकाल
सात वर्षाखालील
मुले : कार्तिकेय कुमार (प्रथम), रियांश कदम (द्वितीय), सोहम गनवानी (तृतीय)
मुलीः भाग्यता सालकर (प्रथम), कश्वी बांदल (द्वितीय), स्वरा खटावकर (तृतीय)

आठ वर्षाखालील
मुले : शौर्य अय्यर (प्रथम), दक्ष वायले (द्वितीय), ऋत्विक इत्ता (तृतीय)
मुली : कश्वी बांदल (प्रथम), भाग्यता सालकर (द्वितीय), मनवा प्रधान (तृतीय)

नऊ वर्षाखालील
मुले : ईशान (प्रथम), दक्ष जहांगीरदार (द्वितीय), मीत लढे (तृतीय)
मुली :अनाहिका सिन्हा (प्रथम), श्रीलक्ष्मी नायर (द्वितीय), महिरा रॅाय (तृतीय)

दहा वर्षाखालील
मुले : दक्ष जहागीरदार (प्रथम), श्लोक पारोनिगार (द्वितीय), रेहांश रणजित (तृतीय)
मुली : अनाहिका सिन्हा (प्रथम), प्रणिथा भावा (द्वितीय), साईशा मुळे (तृतीय)

११ वर्षाखालील
मुले : सिद्धांत नारायणन (प्रथम), गौरीश सुरेश (द्वितीय), आदित्य धाकरस (तृतीय)
मुली : अवनी गोवेकर (प्रथम), महती रामकुमार (द्वितीय), गुंजन चोरमाले (तृतीय)

१२ वर्षाखालील
मुले : श्लोक भारती (प्रथम), श्रीहर्ष नायर (द्वितीय), शिवम करंगुटकर (तृतीय)
मुली : महती रामकुमार (प्रथम), जिया फुलबदूवा (द्वितीय), स्पृहा सोमण (तृतीय)

१३ वर्षाखालील
मुले : नेहान मेहता (प्रथम), श्रीहर्ष नायर (द्वितीय), अन्वय आचरेकर (तृतीय)
मुली : शची कुलकर्णी (प्रथम), सान्वी राणे (द्वितीय), मुग्धा गोडबोले (तृतीय)

१५ वर्षाखालील
मुले : क्षितीज दत्ता (प्रथम), अन्वय आचरेकर (द्वितीय), मानस वानखेडे (तृतीय)
मुली : सान्वी राणे (प्रथम), देविका देसाई (द्वितीय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT