मुंबई

पिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावे

CD

वज्रेश्वरी, ता. २८ (बातमीदार) : भिवंडी लोकसभा क्षेत्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवारी आणि सोमवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड आणि वाडा तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर भाताच्या मळणीची कामे सुरू आहेत; मात्र अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरवून घेतला गेला. भात पिकाबरोबरच शेतकऱ्यांकडून भाजीपाला उत्पादनही घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई देण्याबाबत निर्देश द्यावे, अशी विनंती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT