जव्हार, ता. २८ (बातमीदार) : ग्रामीण आदिवासी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे, परंतु केवळ खरिप हंगामानंतर अन्य कोणतेही रोजगाराचे साधन नसल्याने आदिवासी शेतकरी हा आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शहराची वाट धरतो, त्यामुळे या भागातील आर्थिक विकास होत नाही. या भागात प्रभावी असे शेती प्रक्रिया उद्योग अथवा शेतीपूरक व्यवसाय उभारल्यास स्थलांतराला रोक लागू शकेल, असे वक्तव्य जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंगडा यांनी व्यक्त केले.
अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसान पाहणी दौऱ्यात सचिन शिंगाडा यांनी माध्यमांशी संवाद साधला. तालुक्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीही वाढत आहे. भाकरी शोधण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. स्थलांतर रोखण्यासाठी तालुक्यात शेतीपूरक प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यात शेतीपूरक उद्योग, व्यवसाय, टोमॅटोपासून सॉस निर्मितीसारखे विविध खाद्यपदार्थ निर्मिती प्रकल्प आदींच्या उभारणीची नितांत गरज आहे. तालुक्यात दुग्ध व्यवसायालाही चालना देता येऊ शकेल. यासाठी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. दूध संकलन केंद्राच्या संख्येत भर टाकणे, दुग्धप्रक्रिया उद्योगाची उभारणी केल्यास त्याचा थेट पशुपालक, शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.