मुंबई

महापालिकेचे कर्मचाऱ्यांना विमाकवच

CD

नवी मुंबई, ता.२८ ः नवी मुंबई महापालिकेच्या कायम तसेच कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आता आयडीबीआय बँकेत होणार आहे. महापालिकेने आयडीबीआय बँकेसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खाते उघडल्यानंतर दोन लाखांचा कॅशलेस ग्रुप इन्शुरन्स तसेच अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटी पर्यंतचा वैयक्तिक अपघात विमाही मिळणार आहे. अशा प्रकारची सेवा देणारी नवी मुंबई महापालिका पहिलीच आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी यांची बँक खाती एका बँकेत असतील तर महापालिकेस एक संस्था म्हणून आर्थिक व्यवहार करणे सोयीचे होईल. विविध सुविधांच्या स्वरूपात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनाही अधिकचा काही लाभ मिळू शकेल याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी संकल्पना मांडली होती. त्यानुसार विविध बँकांसोबत संपर्क साधण्यात आला होता. त्यांना या अनुषंगाने प्रस्ताव सादर करणेविषयी आवाहन करण्यात आले. यामध्ये प्राप्त १२ बँकांच्या प्रस्तावांचा अभ्यास करून त्यामधील चार बँकांना अंतिम सादरीकरण करण्यास पाचारण केले होते. यावेळी पालिकेतर्फे आयुक्त राजेश नार्वेकर आणि आयडीबीआय बँकेतर्फे मुख्य महाव्यवस्थापक शशांक दिक्षीत यांनी सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली.
--------------------------------------
कर्मचाऱ्यांना विविध लाभ
- नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना विविध सुविधांचे लाभ बँकेमार्फत देण्यात येणार आहेत. यात कर्मचाऱ्यांना रूग्णालयातील प्रतिदिन रूम भाडे २ टक्के म्हणजेच ४ हजार व आयसीयूकरिता ८ हजार इतक्या मर्यादेत असणार आहे.
- विमा रक्कम पूर्ण होईपर्यंत अधिकारी, कर्मचारी आवश्यकतेनुसार कितीही वेळा रूग्णालयात दाखल होऊ शकतात. सर्वसाधारण प्रसूतीसाठी ५० हजार व सिझेरियन प्रसूतीसाठी ७५ हजार विमा कव्हर असणार आहे.
- रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी ६० दिवसांपर्यंतचा आणि रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर १२० दिवसांपर्यंतचा वैद्यकीय खर्च अनुज्ञेय असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT