भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २७) सकाळी घडली. निर्मला कृष्णा कांदेकर (५५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी आठ वाजता मृत निर्मला कांदेकर जय मल्हार धाब्याच्या समोरून कल्याणच्या दिशेने पायी चालत जात होत्या. दरम्यान, त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात निर्मला यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा मनोज कांदेकरच्या तक्रारीवरून वाहनचालकाच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार एस. ए. गोल्हार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.