मुंबई

ठाणे महापालिका क्षेत्रात भारत संकल्प यात्रा सुरू

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात मंगळवारी (ता. २८) सकाळी झाली. अॅपलॅब चौक, मॉडेला मिल नाका येथे शिबिर आयोजित केले होते. महापालिका क्षेत्रात ७४ ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दुसरे शिबीर साई हॉस्पिटल, शिवाजीनगर या भागात झाले.

मान्यवरांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाची पाहणी केली. तत्पूर्वी विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या हस्ते रथाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या यात्रेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमाची माहिती देणे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्त बांगर म्हणाले. देशभरात असे रथ सर्वत्र जाणार आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ७४ ठिकाणी ही यात्रा जाईल. त्याची पूर्वतयारी गेल्या १५ दिवसांपासून सुरू होती असेही त्यांनी सांगितले.

पीएम स्वनिधी या फेरीवाल्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेत मुंबई महानगर क्षेत्रात ठाण्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच पीएम ई बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यातही ठाणे शहराचा समावेश झाला आहे. त्यातून फेब्रुवारी २०२४ पर्यंत १०० बसगाड्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती बांगर यांनी दिली. स्वच्छ भारत अभियानाचा संदेश पोहोचवणे हा या यात्रेचा उद्देश आहे.

दरम्यान, पीएम स्वनिधी या योजनेतून कर्ज मिळालेल्या स्नेहा जाधव, संगीता गुरव, माणिकराव आठवले आणि खैरे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या काळात वाईट परिस्थिती असताना पीएम स्वनिधीतील कर्जाने खूप मोठा आधार दिला. ही योजना ठाणे महापालिकेमार्फत समजली आणि त्याची अंमलबजावणीही वेगाने झाली, असे लाभार्थी म्हणाले. ही पीएम स्वनिधी योजना म्हणजे नवसंजीवनी योजना आहे असेही त्यांनी सांगितले. या वेळी आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक संजय वाघुले, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT