नालासोपारा, ता. २८ (बातमीदार) : धारदार हत्याराने आणि दगड डोक्यात घालून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गजवळ एका तरुणाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटवून तीन आरोपींना अटक करण्यात वसई गुन्हे कक्ष शाखा २ च्या टीमला यश आले आहे. रिक्षा डम्परला ठोकून नुकसान केल्याच्या रागातून मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याबाबत नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लवेश रमेश माळी (वय २३) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो नायगाव पूर्वेकडील कामन चौकीजवळील बीबीपाडा येथील रहिवासी आहे. २१ नोव्हेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे ब्रिजजवळ एक व्यक्ती नैसर्गिक विधीसाठी गेला असता झुडपात सडलेला मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. मृतदेहाच्या डोक्यात गंभीर वार करून त्याची हत्या केली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. अहवालावरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता.
------------------
रिक्षा डम्परला ठोकल्याच्या रागातून कृत्य
हत्येचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. वसई गुन्हे शाखा कक्ष २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे यांच्या पथकाने सर्वत्र या गुन्ह्याचा तपास सुरू केला. प्रथम मृताच्या कापड्यावरून ओळख पटवली. त्यानंतर आरोपींचा तपास केला असता एक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या दोन ३० वर्षीय मित्रांनी रिक्षा डम्परला ठोकल्याच्या रागातून ही हत्या केली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून नायगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.