मुंबई

किरकोळ वादातून दगडाने ठेचून हत्या

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील खाडीकिनारी सोमवारी (ता. २७) एक मृतदेह आढळून आला होता. मृताच्या डोक्यावर वार केल्याच्या खुणा होत्या. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी १६ तासांत मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेत हत्येचा उलगडा केला आहे. सोमनाथ शिंदे (वय ४४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी योगेश डोंगरे (वय ४३) व विलन टावरे (वय ४१) यांना अटक केली असून तिसरा आरोपी दीपक करकडे याचा पोलिस शोध घेत आहेत.
सोमवारी डोंबिवली पश्चिमेला देवीचापाडा खाडीकिनारी एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदारे यांना दिली होती. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मृताच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा आढळल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भवर, पोलिस हवालदार दीपविजय जमादार, शकिल जमादार, राजेश पाटील, नितीन भोसले, हृषीकेश सकपाळ, मनसब पठाण, प्रशांत दिवटे, निसार पिंजारी यांच्या पथकाने शोध सुरू केला. मृत व्यक्तीचे कपडे एका रिक्षातील व्यक्तीशी जुळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्या रिक्षाचा पोलिसांनी शोध घेतला असता मोठागाव येथून पोलिसांनी योगेश आणि विलन याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेतला जात असल्याची माहिती डोंबिवलीचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.

--------------
दारू पिऊन झालेल्या भांडणातून कृत्य
मृत सोमनाथ हा फुले नगर येथे राहणार असून तो व आरोपी एकमेकांचे परिचित होते. सोमनाथ हा कधी रिक्षा चालवीत असे; तर कधी वेठबिगारीचे कामदेखील करत असे. आरोपी व सोमनाथ हे एकत्र दारू पित असत. त्यातून त्यांचे वादही होत असत. शनिवारी (ता. २५) त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. या भांडणातून आरोपींनी सोमनाथ शिंदे याला डोक्यात दगड घालून ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकून दिला होता, असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT