सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : डोंबिवलीतील खोणी येथे अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. खोणी पलावा परिसरातील जागरूक नागरिकांनी ही बाब मानपाडा पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एमडी नावाचे ड्रग्जसह अडीच लाख रुपये केले जप्त केले आहेत. येत्या डिसेंबरमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हे अमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच जागरूक नागरिकांनीच आता अमली पदार्थ विक्री करणार्या दोघांना पकडण्यात जागरूकता दाखवल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.