मुंबई

‘उज्ज्वला’च्या हाताला चटके

CD

पनवेल, ता. ३० (बातमीदार)ः दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच जंगलतोड आणि चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत घरोघरी सिलिंडरचे वितरण केले होते. मात्र, एकीकडे गॅसचे भाव गगनाला भिडले असताना दुसरीकडे सवलतही बंद झाल्याने उज्ज्वला योजनेचे लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत आहेत.
देशातील गरीब कुटुंबांतील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत गरीब महिलांना १०० रुपयांत गॅसची जोडणी मिळणार आहे. सध्या पनवेलमध्ये या योजनेचे २ हजार १५५ ग्राहक आहेत. काही वर्षे या योजनेतून अगदी माफक दरात गॅस सिलिंडर मिळाला. त्यामुळे चुलीमधून निघणाऱ्या धुरापासून महिलांची सुटका झाली होती, पण आता गॅसचे दर तब्बल हजाराच्या घरात गेले असल्याने योजनेतील लाभार्थ्यांना त्याची झळ बसू लागली आहे. पनवेलच्या ग्रामीण भागांतील आदिवासी, मजूर तसेच शेतकऱ्यांना दिवसभर रोजंदारी करून घरातील आर्थिक घडी बसवणे जिकीरीचे झाले आहे, तर घरगुती गॅसचे भाव वाढल्याने ग्रामीण भागांत पुन्हा चुलींसाठी सरपण गोळा करण्याची महिलांची धावपळ सुरू झाली आहे.
-----------------------------------------
योजनेच्या अपयशाची कारणे
- धुरामुळे फुप्फुसाचे आजार होतात, डोळ्यांना त्रास होतो, तसेच जंगलतोडही होते. त्यामुळे घराघरांत गॅस पोहोचला पाहिजे, या हेतूने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाली होती. मात्र, आता महागाईमुळे अनेक घरांमध्ये गॅसचे रिकामे सिलिंडर भरण्याचीही अडचण होत आहे.
- गेल्या सात वर्षांत ४१० रुपयांवरून घरगुती गॅसचा दर १,०६० रुपयांवर पोचला आहे. त्यात ग्रामीण भागात तर घरपोच करण्यासाठी १,०८० रुपये लागत आहेत. त्यात आता अनुदान मिळत नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.
------------------------------------------------
महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. सरकारने गॅसचे दर ९०० च्या पुढे नेऊन ठेवले आहेत. मोलमजुरी करून पोट भरायची भ्रांत असताना एवढे पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न सतावत आहे.
- पद्मा शिंगवा, गाढेश्वर, गृहिणी
-------------------------------------------
स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असून यामुळे आमचे बजेट कोलमडत आहे. गोरगरीब आणि अत्यल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत जोडणी मोफत मिळाली; परंतु सबसिडी बंद झाल्याने सिलिंडर परवडत नाही.
- शारदा खैर, खैरवाडी, गृहिणी
-------------------------------
आधार कार्ड व रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन त्यावेळी शेगडी आणि गॅस दिला गेला. दोन हजार रुपये मोजावे लागले. आता दर महिन्याला सिलिंडरचे भाव वाढताहेत. आता डोंगरात, रानावनात जाऊन सरपण गोळा करावे लागते.
- जागृती कातकरी, आंबे शिवनसई, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT