मुंबई

रेल्वेचा मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेची काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.

मध्य रेल्व
कुठे - माटुंगा ते मुलुंड
कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम
सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर पुन्हा अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

हार्बर रेल्वे
कुठे - सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
कधी - ११. १० ते ४.४० वाजेपर्यंत

परिणाम
सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. तथापि, ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT