मुंबई

ठाण्यात सार्वजनिक शौचालय स्वच्छ मोहीम

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून २५ डिसेंबरपर्यंत देशव्यापी स्वच्छ शौचालय मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० आणि राज्य महाराष्ट्र मिशन अर्बन २.० यांच्या अंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे महिनाभर शहरातील नऊ प्रभाग समितीतील सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. ही मोहीम अखंड सुरू राहावी यासाठी महापालिकेने २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि घनकचरा विभाग यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची तपासणी केली. त्यातून प्रत्येक प्रभाग समितीतील एक याप्रमाणे नऊ शौचालयांची निवड या मोहिमेसाठी केली आहे. सार्वजनिक शौचालये ही नागरिकांना वापरण्यायोग्य, सहज उपलब्ध होतील म्हणजेच घरापासून जवळ, स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही असतील या निकषांवर मोहिमेतील शौचालयांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत महापालिकेने निवड केलेल्या सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्वच सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. तसेच नागरिकांनीदेखील सार्वजनिक शौचालयांचा वापर केल्यानंतर शौचालय स्वच्छ ठेवणेदेखील गरजेचे आहे.
उपक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावा व नागरिकांनीही सक्रिय सहभागी व्हावे, यासाठी ठाणे महानगरपालिका ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसह विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाचा प्रचार करीत असून सामाजिक जबाबदारी म्हणून नागरिकांनीदेखील या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT