मुंबई

कल्याण लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा ?

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ३ : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे कल्याण पूर्वेत भाजपकडून जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला गेला. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पुन्हा गौप्यस्फोट केला आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर भाजपचे उमेदवार विजयी होतील, असे त्यांनी या जल्लोषात म्हटले आहे. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर पुन्हा भाजपने दावा केल्याचे दिसून येत आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतरदारसंघ आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ आपल्याकडे यावा, यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. तसेच हा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी खासदार डॉ. शिंदे हे जोर लावत आहेत. राज्यातील सत्तेत भाजप आणि शिंदे हे मित्रपक्ष असले तरीही स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर येत आहेत. मानपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या बदलीवरून हा वाद चर्चेला आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी शिंदे गटाच्या विरोधात परखड भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद शांत केला असला तरी अधूनमधून वादाची ठिणगीही पडताना दिसते. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद काही केल्या कमी होत नाही. त्यातच आमदार गायकवाड हे विकासकामांवरून शिंदे गटाला कानपिचक्या देण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आमदार गायकवाड यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे.
...
काय म्हणाले गायकवाड?
भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नागरिकांचा विश्वास आहे. यामुळे या तिन्ही राज्यांत भाजप आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्येही भाजप बहुमतात आहे. त्यामुळे हा जल्लोष आम्ही करत आहोत. येणाऱ्या काळात याठिकाणी राज्याच्या निवडणुका असतील किंवा केंद्राच्या निवडणुका असतील, यासर्व ठिकाणी भाजप आघाडीवर असेल. तसेच कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेत जे आमच्या भाजपचे उमेदवार उभे असतील ते निवडून येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2030 Commonwealth Games : २०३०च्या 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा'बाबत मोठी अपडेट!, यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस

Pat Cummins ने सांगितली भारत-ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम ODI XI; रोहित-विराटला स्थानच नाही, 'या' तीन माजी भारतीयांना निवडलं

Pakistan Afghanistan: काबूलवर पाकिस्तानचा बॉम्बवर्षाव, अफगाणिस्तानकडून ड्रोन हल्ला; 48 तासांची शस्त्रसंधी

T20 World Cup 2026: नेपाळ-ओमान वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार! १९ संघ ठरले, आता उरली एक जागा

Latest Marathi News Live Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT