मुंबई

ठाणे-बेलापूर मार्गावर जड-अवजड वाहनांना बंदी

CD

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर्स येथे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील जड-अवजड वाहनांना पूर्णत: बंदी घातली आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना पर्यायी मार्गाची व्यवस्थादेखील केली आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावर जड-अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना काढली असून बुधवारी (ता. ६) ही अधिसूचना लागू होणार आहे.

--------
जड-अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
१. ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना अग्निशमन जंक्शनपासून डावीकडे वळण घेऊन माय कार (मारुती सुझुकी) शोरूम येथून एमआयडीसीमार्गे इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
२. ठाणे-बेलापूर मार्गावरील अग्निशमन जंक्शन व पावणे गाव एमआयडीसीपासून पुढे आलेल्या जड-अवजड वाहनांना सविता केमिकल ब्रीजखालून डावीकडे वळण घेऊन शालीमार चौक एमआयडीसीमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
३. तुर्भे नाक्याकडून इंदिरानगर सर्कल येथून अमाईन्स कंपनीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येत असून तुर्भे नाक्याकडून इंदिरानगर सर्कल येथून अमाईन्सकडे जाणाऱ्या वाहनांना इंदिरानगर सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
४. तुर्भे नाक्याकडून हनुमान नगर टी पॉईंट येथून निवारा लॉज व रुपा रेनिझन्स हॉटेलकडे जाणारा मार्गदेखील बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना हनुमान नगर टी पॉईट येथून सरळ इंदिरानगर सर्कल व तेथून डावीकडे वळून पुढे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
५. पुणे-मुंबई महामार्गावरून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उरण फाटा ब्रीजखालून उजवे वळण घेण्यास, तसेच अपोलो हॉस्पिटल, जेएनपीटीमार्गे येणाऱ्या सर्व वाहनांना उरण फाटा ब्रीजखालून एमआयडीसीमार्गे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना उरण फाटा ब्रीजखालून एलपी ब्रीज-शरयू मोटर्स-तुर्भे ओव्हर ब्रीज व सविता केमिकल ब्रीजखालून उजवीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जाता येणार आहे.
६. महापे अंडरपासमधून ठाण्याकडून येणाऱ्या वाहनांना डावीकडे वळण घेऊन महापे शिळफाटा, कळंबोलीमार्गे जेएनपीटीकडे तसेच पुणे व गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटील पोलिसांच्या रडारवर का आली? नेमकं प्रकरण काय? तपासाची चक्र फिरणार!

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत घेणार बैठक

Italy Road Accident : पर्यटनासाठी गेलेल्या अख्तर कुटुंबावर काळाचा घाला; इटलीतील भीषण अपघातात नागपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू, मुलगी गंभीर

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

Cheque Clearance Rule: आरबीआयचा मोठा निर्णय; आजपासून चेक लगेच क्लिअर होणार, बँकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल

SCROLL FOR NEXT