मुंबई

दादर स्थानकाचं नाव चैत्यभूमी करण्याची कॉंग्रेसची मागणी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून स्थानकाचे नामांतर केले. त्याच धर्तीवर दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी असे करावे, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली.
दादर स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याची आंबेडकरी अनुयायांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गायकवाड यांनीही चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले. त्या वेळी या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी दादर स्थानकाला चैत्यभूमी असे नाव द्यावे अशी मागणी केली. ओशिवरा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असे नाव दिले आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादर येथे राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अंतिम विधी येथेच झाले. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT