सुकामेव्याचा आरोग्यदायी खुराक
नेरुळ, ता.९ (बातमीदार)ः सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक फळांचा हंगाम हा वेगवेगळा असतो; त्यामुळे हंगामा व्यतिरिक्त बाजारपेठेमध्ये ही फळे मिळावी म्हणून त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी करून वाळवले जाते. त्यामुळे डिहायड्रेशनच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या सुकामेवाचे पौष्टिक गुणधर्म शरिरासाठी अधिक उपयुक्त असतात.
-----------------------------
बदाम ः बदामाला ड्रायफ्रूटचा राजा म्हटले जाते. आकाराने छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा हे घटक आहेत. शिवाय कॅलरीचे प्रमाण कमी असते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. चवीसह पौष्टिक गुणधर्मांचा साठा असल्याने सुकामेवा आवडीने खातात.
-----------------------------
काजू ः हाडांना मजबूत ठेवण्यासाठी काजू खूप उपयुक्त ठरते. कारण काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात आढळतात. काजूमधील पोषक घटकांमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचे सेवन करा. काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट पोषक घटक त्वचेला विविध समस्यांपासून वाचवण्यासाठी मदत करतात.
----------------------------
अक्रोड ः अक्रोड खाल्याने मेंदू सक्रिय होतो. अक्रोडामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशिएअम, लोह, तांबे आणि सेलिनियम यासारखी पोषकद्रव्ये असतात. त्यामुळे अक्रोड खाल्याने हृदय निरोगी आणि तंदुरुस्त राहते. त्यामुळे अक्रोड खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा फॅटी अॅसिड असते. जे हृदयरोगांवर गुणकारी आहे. अक्रोड खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
-----------------------------
खारीक ः प्रत्येकाच्या घरी असणारा हा प्रकार आहे. खजूर-खारीक हे चवीला गोड असल्यामुळे अनेकांना आवडते. खारीक हे ऊर्जेचा भंडार आहे. खारीकमध्ये फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे घटक असतात. ज्यांना हाडांसंदर्भात काही व्याधी असतील तर त्यांनी खजूराचे सेवन करावे. तसेच कोंडा, केस गळती कमी करण्यासाठी खारीक हे उत्तम आहे.
-----------------------------
मनुका ः नियमित सेवन केल्याने मोठ्या आजारांपासून बचाव होतो. मनुकामध्ये पॉलीफेनोलिक नावाचे फायटोकेमिकल भरपूर प्रमाणात असते. दृष्टीसाठी ते खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले इतर अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्त्वे डोळ्यांना रातांधळेपणा, काचबिंदू आणि मोतीबिंदूपासून वाचवण्यास मदत करतात. तसेच वजन वाढवायचे असेल तर मनुका हे एक उत्तम अन्न पूरक आहे.
---------------------------------
पिस्ता ः ड्राय फ्रुट्समधील ‘पिस्ता’ हा घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अतिशय पोषक आणि फायबर समृद्ध ड्राय फ्रूट आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने आढळतात. पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. यामध्ये व्हिटॅमिन ई-मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते.
-----------------------------------
अंजीर ः अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. गुडघ्याचे दुखणे कमी करण्यासाठी सुके अंजीर फायदेशीर आहे. अंजीरमुळे शक्ती, ऊर्जा वाढते.
-----------------------------------
केसर ः केशर सर्वात शक्तिशाली औषधी वनस्पतींपैकी एक आहे. याच्या सेवनाने आरोग्याला असंख्य फायदे होतात. केशरमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा पुरवतात. कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या प्रथिने, जीवनसत्त्वांचा खजिना आहे. केशरच्या सेवनाने सर्दी-खोकल्यावर उपचार करण्यास, मानसिक आरोग्यास चालना देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.