मुंबई

मुंबई भाजप महिला मोर्चाचे धीरज साहू यांच्याविरोधात आंदोलन

CD

मुंबई, ता. ९ : घरात २०० कोटी रुपये रोख रक्कम सापडलेल्या काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या निषेधार्थ आज मुंबई भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या १० घर व कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांत आतापर्यंत २०० कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. जप्त केलेल्या नोटा मोजताना मशिनही बिघडली. या प्रकरणात साहूंविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच त्यांना अटक केली पाहिजे. गरिबीचा नारा देणाऱ्या काँग्रेसने याबाबत थोडी तरी लाज बाळगावी. सरकारने भ्रष्ट काँग्रेसच्या नेत्यांवर छापे मारून त्यांची अवैध संपत्ती जप्त करावी, अशीही मागणी देसाई यांनी केली. यावेळी बिंदू त्रिवेदी, सरिता राजपुरे, शशिबाला टाकसाळ, ज्योती दुराफे, योजना टाकळे, समिता कांबळे, सरिता पाटील, जान्हवी राणे, नेहा ठाकूर आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गात बदल निश्चित! सोलापूर जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी सांगितला कसा असेल बदल..

Viral Video: याला म्हणतात नशिबाची फिरकी! Window Seat बुक करूनही मिळाला धक्का; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत एंट्री; दिसणार भयानक अवतारात; प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

Kolhapur Crime : न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला धमक्या देत लाखोंची मागणी; मुरगूडमध्ये खळबळ

Pune News: शिक्षकाला घरातून उचलून आणून गंभीर मारहाण; शिरुर तालुक्यातील धक्कादायक घटना, विद्यार्थ्यांचे आंदोलन!

SCROLL FOR NEXT