मुंबई

बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CD

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : संपूर्ण देशात सध्या ‘राम’मय वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान बनवा मी दोन काम प्राधान्याने करेन एक म्हणजे अयोध्येत राम मंदिर बांधणे व दुसरे काश्मीरमधून ३७० कलम हटवेन. बाळासाहेबांची ही दोन्ही स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली. त्यामुळे त्यांचे कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच आहेत असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काशीमिरा येथे व्यक्त केले.

राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त मिरा-भाईंदर मधून तीनशे रामभक्त पायी अयोध्येला रवाना झाले. या राम भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, रामभवन शर्मा आदी उपस्थित होते.
या पदयात्रेचा खर्च आमदार प्रताप सरनाईक करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आधी ‘हर घर मोदी’ होते आता ‘मन मन मोदी’ झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येचा चेहेरा मोहोरा बदलला आहे. अयोध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित करण्याचे काम मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी १९८७ मध्ये कारसेवा सुरु असताना चांदीची वीट बनवली होती. आज राम मंदिर बनवायचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले.

..
विरोधकांना टोला
काही जणांना राम मंदिर कधीच होणार नाही, असे वाटायचे म्हणून ते चेष्टेने म्हणत होते, की मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिरही बनवले व त्याच्या लोकार्पणाची तारीखही जाहीर केली. त्यामुळे बोलणाऱ्यांची तोंडे आपोआपच बंद झाली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT