Thane sakal
मुंबई

Thane: डायघर वीज प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध; आंदोलनाचा इशारा

शुक्रवारी ग्रामस्थांनी धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने डायघर येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पास गावकऱ्यांचा सुरुवातीपासून विरोध राहिला असून प्रकल्प येथून हटवावा, यासाठी ग्रामस्थ आजही लढा देत आहे. ग्रामस्थांच्या प्रश्‍नांकडे ठाणे महापालिका गांभीर्याने लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी शुक्रवारपासून (ता. १५) धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

ठाणे महानगरपालिकेचा डायघर येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पासाठी कचरा घेऊन जाताना घंटागाड्यांमधून रस्त्यावर कचरा सांडला जातो. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधीसह डासांचा त्रास रहिवासी आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. डायघर प्रकल्प सुरू होण्यापूर्वी ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता.

मात्र स्थानिकांचा विरोध बाजूला सारत ठाणे महापालिकेने प्रकल्प सुरू केला आहे. प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, अशी ग्वाही पालिका अधिकारी ग्रामस्थांना वेळोवेळी देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गावांवर प्रदूषणाची चादर पसरली आहे. त्यामुळे शुक्रवारी ग्रामस्थांनी धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

पार्कसाठी आरक्षित जागेवर प्रकल्प
महापालिकेच्या मंजूर सुधारित विकास आराखड्यात डायघर येथील सर्व्ह नंबर १३, १४, १८, १९, २० मधील १८ हेक्टर जमीन पार्कसाठी आरक्षित आहे. या जमिनीपैकी पाच हेक्टर जमिनीत सुरू असलेला घनकचरा प्रकल्प रद्द व्हावा या करिता राज्य शासन व ठाणे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता शुक्रवारी पडले गावाजवळ ग्रामस्थांनी एकत्र येऊन धरणे लक्षवेधी आंदोलन केले.

या आंदोलनात मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गृह संकुलातील रहिवासी आणि भूमिपुत्रांच्या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. येत्या कालखंडात आंदोलन तीव्र करण्याचा इशारादेखील भूमिपुत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT