मुंबई

कला-क्रीडा महोत्सवात दहीहंडी, कुस्तीची प्रात्यक्षिके

CD

विरार, ता. १७ (बातमीदार) : वसई कला-क्रीडा महोत्सवात दहीहंडी आणि कुस्ती स्पर्धांची प्रात्यक्षिके होणार आहेत. ३४ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी समितीची बैठक शनिवारी (ता. १६) वसईतील गणपतराव वर्तक क्रीडा भवन येथे पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नेहमीप्रमाणे शेवटच्या आठवड्यात प्रवेश अर्ज मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. यावर्षीही स्पर्धक संख्या मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी जाहीर केले. २७ डिसेंबर रोजी दहीहंडी व कुस्ती स्पर्धांची प्रात्यक्षिके, २८ डिसेंबर रोजी शरीरसौष्ठव स्पर्धा आणि २९ डिसेंबर रोजी फॅशन शो होणार असल्याचे सांगितले. या वेळी क्रीडा, साहित्य, कला व सिनेक्षेत्रातील अनेक पाहुणे महोत्सवाला सदिच्छा भेट देणार असल्याचे सांगितले. यावर्षीपासून सुरू करण्यात आलेली स्केटिंग स्पर्धा विरारमधील यशवंत नगर येथील अमेय स्पोर्ट्स क्लबमध्ये ३० डिसेंबर रोजी होईल. २५ डिसेंबर रोजी नानभाट चर्च ते वसईदरम्यान ख्रिसमस फिटनेस रनचे आयोजन होणार आहे.

स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धांचे वेळापत्रक २३ डिसेंबरला वसईतील क्रीडामंडळ येथील फलकांवर लावली जाणार आहेत. यश सचिन जाधव याने राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले. या सभेला सरचिटणीस प्रकाश वनमाळी, संघटक सचिव संतोष वळवईकर, क्रीडा प्रमुख विजय चौधरी, ज्युड डिसोझा, योगेश चौधरी, स्वप्नील पाटील, राजेंद्र भोईर, कला विभागाचे प्रशांत घुमरे, कल्पक घरत, स्वाती जोशी, राजेश जोशी, प्रीतेश पाटील आदींसह अनेक स्पर्धाप्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT