मुंबई

वासिंद,आसनगाव उड्डाण पुलाचे काम अर्धवट

CD

खर्डी, ता. २० (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या वासिंद, आसनगाव व कसारा येथील उड्डाणपुलाचे काम निकृष्ट व संथगतीने होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अर्धवट कामांमुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. तसेच अपघातात अनेकांचा नाहक जीव गेला आहेत. या कामामुळे येथे रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना तासन् तास खोळंबून राहावे लागत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कसारा बायपास रोडवरील वाशाळा फाट्यावर खड्डे पडल्याने पावसाळ्यात पाणी साचून डबके तयार होते. तसेच वाहने खड्ड्यात आपटत असल्याने नादुरुस्त होत आहेत. चौफुलीवरील महामार्गावर टाकण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याच्या सळ्या वर आल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्स ठेवले आहेत. त्यामुळेही कुठल्या रस्त्याने ये-जा करायची याबाबत चालकांचा गोंधळ उडत आहे; तर अनेकदा वाहने समोरासमोर येऊन अपघात होत आहेत. यातून चालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रस्त्याची दुरुस्ती करताना काही ठिकाणी डांबर; तर काही ठिकाणी माती टाकली आहे. यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच धुळीमुळे चालक, नागरिकांना श्वसनाचा त्रास होतो. मागील आठ महिन्यांपासून सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर खडी पसरवून ठेवल्याने गाडी चालवताना चालकाना कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना पाठ, कंबर व अंगदुखीचा त्रास होत आहे.


कसारा बायपासवरील निकृष्ट काम व अडचणींबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व शासकीय विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
- महेश गिळदे, शाखाप्रमुख, ठाकरे गट शिवसेना, कसारा.


स्थानिक ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काम बंद आहे. लवकरच येथील अडचणी सोडवून काम सुरू करण्यात येईल.
- शशांक अडके, उपव्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग विभाग, (गोंदे-वडपे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT