मुंबई

गुजरात-महाराष्ट्र सीमाप्रश्नांसाठी उद्या बैठक

CD

कासा, ता. २० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्याकडून झालेल्या अतिक्रमणाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी सर्व संबंधित सरकारी यंत्रणांसह शुक्रवारी (ता. २२) डिसेंबरला बैठकीचे आयोजन केले आहे.
गुजरात-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई ग्रामपंचायतीत गुजरातमधील उंबरगाव तालुक्यातील सोलसुंबा आणि गोवाडा ग्रामपंचायतीमार्फत अतिक्रमण केल्याचा मुद्दा काही वर्षांपासून चर्चेत आला आहे. याविषयी वेळोवेळी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित होऊनही यावर मार्ग काढण्यासाठी सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. याविषयी मार्ग काढण्याच्या उद्देशाने आमदार निकोले यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी तलासरी तहसीलदारांसह तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी, वेवजीचे मंडळ अधिकारी, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्यासह इतर संबंधित सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना येथे दोन्ही सीमा भागांतील सर्व कागदपत्रे आणि संबंधित जागेच्या मोजणी नकाशासह उपस्थित राहण्याची सूचना आमदार निकोले यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : धबधब्यात दगडांवरून पाय घसरून पडला, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT