Thane Bharat Cooperative Bank sakal
मुंबई

Thane: १० वर्षांच्या लढ्याला अखेर यश; ठाणे भारत सहकारी बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

सकाळ डिजिटल टीम

ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड कर्मचाऱ्यांच्या १० वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले असून बँकेने पगारवाढ मंजूर केली आहे. वेतनवाढ करारानुसार शिपाई ते वरिष्‍ठ व्यवस्‍थापक या ग्रेड समाविष्ट असून त्यांना सरासरी ३५०० ते ८५०० रुपये वेतनवाढ मिळणार आहे. या निर्णयामुळे कर्मचारीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड आणि बँक कर्मचारी/अधिकाऱ्यांमध्ये पगारवाढीबाबत संघर्ष सुरू होता. २०१३ पासून प्रलंबित असलेल्या करारात बँक व्यवस्थापन आणि युनियन यांच्यात मतभेद झाल्याने युनियनने न्यायालयात धाव घेतली. २०२१ मध्ये औद्योगिक न्यायालयाने को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनच्या बाजूने निकाल देत पगारवाढ करण्याचे बँकेला आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


याबाबतची सुनावणी प्रलंबित असताना बँक व्यवस्थापन आणि युनियनमध्ये चर्चा सुरू होत्या. अखेर बँक आणि युनियनने सुवर्णमध्ये साधत हा प्रश्‍न कायमचा निकाली काढला. करार यशस्वी करण्यात युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, बँकेचे अध्यक्ष मिलिंद गोखले यांच्यासह युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस प्रदीप पाटील, सल्लागार नरेंद्र सावंत, संघटक सचिव सुनेश जोशी, अविनाश शेवाळे, राजेश आंबवणे, नितीन कारखानीस, अमर पाटील यांचे मोठे योगदान आहे.

दोन कोटींचा बोजा
वाढीव पगाराचा जादा आर्थिक भार पडून बँकेवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी तडजोड करत मध्यम मार्ग काढला. आता करारानुसार २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी दोन कोटींचा बोजा घेण्याचे बँकेने मान्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT