Crime Against Women esakal
मुंबई

Mumbai Crime: धारावीत ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. असाच एक प्रकार धारावीत घडला आहे. येथील सोशलनगर येथील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आरोपी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी आपल्या विभागातील सार्वजनिक महिला शौचालयाच्या कट्ट्यावर बसली होती. त्या वेळेस आरोपीने तिची छेड काढून तिला जवळ ओढून तिच्या खासगी जागेस लज्जास्पद पद्धतीने हात लाऊन पीडितेचा विनयभंग केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ आणि २६ डिसेंबर रोजी सकाळी पीडित मुलगी तिच्या घराबाहेर एका कट्ट्यावर बसली होती. तेव्हा परिसरातील कुप्पा वडीवेल देवेंद्र ऊर्फ दर्पण याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला जवळ ओढून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या घरापासून नुरूलहुदा मस्जिदपर्यंत पाठलाग करून तिची छेड काढत होता. याची तक्रार पोलिसांत पीडितेच्या आईने केली. पोलिसांनी तातडीने आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT