crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: स्‍वस्त‍ात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक; गुन्हा दाखल!

CD

बँकेने सील करून जप्त केलेला फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने २८ व्यक्तींकडून सुमारे ८४ लाख रुपयांची रक्कम उकळून फसवणूक केल्‍याची घटना समोर आली आहे. हार्दिक दिघे, असे या भामट्याचे नाव असून नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.


आरोपी हार्दिक दिघे याने जानेवारी २०२१ मध्ये वाशी रेल्वे स्थानकाजवळच्या रिअल टेक पार्कमधील बाराव्या मजल्यावर एनपीए लिक्विडेटर नावाने कार्यालय थाटले होते. त्यानंतर त्याने बँकेकडून सील करण्यात आलेले फ्लॅट विक्री करण्यासाठी आपली नेमणूक केल्‍याचे भासवून तशी जाहिरातबाजी सुरू केली होती. या जाहिरातबाजीला भुलून नवी मुंबईसह मुंबई व ठाण्यातील अनेक गरजवंतांनी कमी किमतीत फ्लॅट मिळेल, या आशेने हार्दिक दिघे याच्या वाशी येथील कार्यालयात धाव घेतली होती.

त्यानंतर भामट्या हार्दिक दिघे याने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून त्यांच्यासोबत एनपीए लिक्विडेटर्स कंपनीसोबत एमओयू करून त्यांचा विश्वास संपादन केला. या प्रकरणी हार्दिक दिघे याने दोन वर्षामध्ये ग्राहकांचे लाखो रुपये घेऊन कुणालाही फ्लॅट दिला नाही. प्रत्येकवेळी तो वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत होता. त्यामुळे यातील काही ग्राहकांनी त्याच्या पाठीमागे पैसे परत करण्याचा तगादा लावला होता. त्‍यामुळे त्याने वाशीतील कार्यालय बंद करून पलायन केले. त्यानंतर फसवणूक झालेल्या २८ ग्राहकांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हार्दिक दिघे याच्या विरोधात वाशी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT