earthquake main  sakal
मुंबई

डहाणू तालुक्यात पुन्हा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ डिजिटल टीम

डहाणू तालुक्यात शुक्रवारी (ता. ५) पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. गेल्या तीन दिवसांत हा दुसरा धक्का जाणवला आहे. त्याचा केंद्रबिंदू अरबी समुद्रात असल्याचे सांगण्यात येते. नवीन वर्षात हिवाळा सुरू झाल्यावर पुन्हा हे धक्के जाणवू लागल्याने पुन्हा नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

डहाणू, तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव, चारोटी, कासा, गुजरातमधील उंबरगाव, वापी, तसेच जव्हार परिसरातील गावांना हा धक्का जाणवला. गेल्या सहा महिन्यांपासून हे धक्के बंद होते. त्यामुळे नागरिक निर्धास्त होते. पुन्हा या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी (ता. ३) दुपारी १.४७ वाजता ३.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का होता. मात्र शुक्रवारी रात्री ९.५३ वाजता ४.१ रिश्टर स्केलचा धक्का बसल्याने पुन्हा परिसरात घबराट निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मात्र आता हिवाळा सुरू झाल्याने नागरिकांना रात्री बाहेर राहता देखील येत नाही.

या धक्क्यामुळे अजून कोणत्याही नुकसान, हानीची माहिती अजून समोर आली नाही. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

Mumbaicha Raja: 'मुंबईच्या राजाचं' ऐतिहासिक विसर्जन होणार; मुर्ती अत्याधुनिक बार्ज जहाजावरून थेट पाण्यात उतरवणार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT