child marriage in navi mumbai esakal
मुंबई

Navi Mumbai Crime: पनवेलमध्ये बारावर्षीय मुलीचा झाला बालविवाह, सर्वेक्षणात आले सत्य समोर!

A 12-year-old girl was subjected to child marriage in Panvel; अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाचा भंडाफोड; पोलिसांची कारवाई सुरू...

CD

Mumbai Crime: बारा वर्षांच्या मुलीचा विवाह २९ वर्षीय तरुणासोबत झाल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खांदेश्‍वर पोलिसांनी पीडित मुलीसोबत जरठकुमारी विवाह करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


पीडित मुलीचे वय १२ वर्षे ९ महिने इतके असून तिचे आई-वडील नवीन पनवेल भागात राहण्यास आहेत. गत गुरुवारी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून नवीन पनवेल भागात सर्वेक्षण सुरू असताना १२ वर्षीय पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी खांदेश्‍वर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या आई-वडिलांकडे त्याबाबत चौकशी केली. (man allegedly repeatedly raped the girl and impregnated her)

पीडितेच्या आई-वडिलांनी सातारा जिल्ह्यातील खटाव येथील रणसिंगवाडी भागात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणासोबत मुलीचे घरच्या घरी लग्न लावून दिल्याचे सांगितले. लग्नानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. ती सातारा येथून नवीन पनवल येथे आई-वडिलांच्या घरी आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

या प्रकरणी डॉक्टरांनी खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलीसोबत जरठकुमारी विवाह करणाऱ्या तरुणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपासासाठी सातारा पोलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT