digha sakal
मुंबई

Digha Railway Station: दिघागाव रेल्वे स्थानकाला 12 जानेवारीचा मुहूर्त; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उदघाटन?

सकाळ डिजिटल टीम

Digha Railway Station : ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघागाव रेल्वे स्थानक मागील सहा महिन्यांपासून बांधून तयार आहे. मात्र स्थानकाचे उद्‍घाटन रखडले आहे. येत्‍या १२ जानेवारी रोजी ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. त्याच दिवशी मोदी यांच्या हस्ते दिघागाव रेल्वे स्थानकाचेदेखील उद्‍घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्यापपर्यंत केंद्राकडून सेंट्रल रेल्वे बॉर्डाला उद्घाटनाबद्दल स्पष्ट आदेश देण्यात आलेले नाहीत; मात्र आयत्या वेळी उद्घाटनाच्या सूचना आल्यास धावपळ होऊ शकते. म्हणून सेंट्रल रेल्वेकडूनदेखील उद्घाटनच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे, असे सेंट्रल रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली व ठाणे रेल्वे स्थानकादरम्‍यान दिघागाव नवीन स्‍थानक तयार करण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन नावाच्या वादामुळे अडकले होते. मात्र केंद्राकडून अखेर दिघागाव नावावर नुकताच शिक्कामोर्तब केले गेले आहे; तर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर दिघागाव रेल्वे स्थानकाचे फलक लावण्यात आले आहे. मात्र दिघागाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन रखडल्याने खासदार राजन विचारे यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे; तर दिघागाव रेल्वे स्थानकासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे नवी मुंबईत येणार असून स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून देण्यात येत आहे; तर माजी खासदार संजीव नाईक यांनीदेखील पंतप्रधान कार्यालयाला दिघागाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी केलेली आहे.

दिघागाव रेल्वे स्थानक हे तत्कालीन खासदार संजीव नाईक यांच्या काळात उभारण्याची मागणी करण्यात आली होती; तर खासदार राजन विचारे यांच्या काळामध्ये २०१६ मध्ये दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र २०१८ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. कोरोनामुळे रेल्वे मजूर नसल्यामुळे स्थानकाचे काम लांबणीवर पडले होते. मात्र सहा महिन्यापूर्वी स्थानकाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यानंतर स्थानकाच्या नावाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अखेर दिघागाव नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर स्थानकाच्‍या प्रवेशद्वारदेखील तयार होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे.

रेल्वे स्थानकासाठी अनेकदा खासदार राजन विचारे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार गणेश नाईक यांनी पाहणी दौरे केले होते. तर मनसेतर्फे स्थानकासाठी आंदोलन करण्यात आले होते. या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनांसाठी स्वातंत्र्यदिन, गणेशोत्वस, दसरा, दिवाळी, नूतन वर्ष असे अनेक महूर्त देत तारीख वर तारीख पडली आहे. मात्र अद्यापही याचे उद्घाटन रखडले आहे. त्‍यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याने त्या दिवशी उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

SCROLL FOR NEXT