मुंबई

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या एसएससी सराव परीक्षेला प्रतिसाद शुभारंभ

CD

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या एसएससी सराव परीक्षेला प्रतिसाद
वाशी, ता. ६ बातमीदार गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एसएससी बोर्डाच्या धर्तीवर घेण्यात येणाऱ्या रौप्य महोत्सवी एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ शनिवारी आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. मागील २५ वर्षात दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेचा लाभ घेत विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त केले आहे.
परीक्षेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. नेरूळ येथे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थिती मध्ये पार पडलेल्या सराव परीक्षेच्‍या शुभारंभ प्रसंगी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार संजीव नाईक, ट्रस्टचे सचिव तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, परीक्षा उपक्रमातील ज्येष्ठ सहकारी अनंत सुतार, दशरथ भगत, विशेष अतिथी म्हणून शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नात जयश्री चौगुले, भाभा अणुशक्ती केंद्रातील निवृत्त ज्येष्ठ वैज्ञानिक अनंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये दहावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणामध्ये सामोरे जाऊन यश संपादित करावे, तसेच आमदार गणेश नाईक यांच्या प्रेरणेने एसएससी सराव परीक्षा सुरू केल्याचे सांगितले. एसएससी बोर्डाप्रमाणेच ही सराव परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमधून विद्यार्थ्यांना आपल्या उणिवा समजतात. यावर्षी ८५ शाळांमधील एकूण ९९०० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. २६ केंद्रांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून ही परीक्षा घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT