मुंबई

उरणमधील शाळेत विद्यार्थ्यांना आसाराम बापूच्या पुस्तकांचे वाटप

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : उरण शहरातील एका शाळेत बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची पुस्तके वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याच्या पालकाने तक्रार केल्यानंतर ही गंभीर बाब उघडकीस आली.
बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावास भोगत असलेल्या आसाराम बापूचे ‘संस्कार सरिता’ नावाचे पुस्तक उरण येथील शाळेच्या पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटल्याची घटना समोर आली आहे. या पुस्तकावर आधारित परीक्षा घेणार असल्याच समजते. शाळेतील काही विद्यार्थ्यांना आसाराम बापूचे ‘संस्कार सरिता’ हे पुस्तक देण्यात आले होते आणि त्यावर आधारित इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार होती.
यासाठी तीन वयोगट ठरविण्यात आले होते. जो विद्यार्थी ६० टक्के प्राप्त करेल, त्याची जिल्हास्तरीय निवड होणार असल्याचे सांगण्यात आले होते. जिल्हास्तरीय टॉपमध्ये सहा विद्यार्थ्यांची निवड करून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला २१ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय ११ हजार, चतुर्थ सात हजार, पाचव्या क्रमांकास पाच हजार, सहाव्या क्रमांकास ३ हजार अशी पुरस्कारांसाठीची रक्कम ठरवलेली होती. या प्रकरणी काही पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT