Mumbai Pollution sakal
मुंबई

Navi Mumbai: प्रदूषणाविरोधात तळोजावासी उतरणार रस्त्यावर!

सकाळ डिजिटल टीम

तळोजा एमआयडीसीतून रात्री हवेत सोडणाऱ्या वायूंमुळे तळोजा परिसरात प्रदूषण वाढले आहे. याविरोधात विविध स्तरांवर तळोजावासी लढा देत आहेत. याच अनुषंगाने ‘एक धाव प्रदूषण मुक्ती’साठीचा संदेश देणारी मॅरेथॉन रविवारी (ता. २८) होणार आहे. यामध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, रहिवासी, सामाजिक संस्था, महिला, युवक मंडळे, परिसरातील गावे आणि प्रदूषणाविरोधात लढा देणारे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.

तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या उग्र वासामुळे खारघर, रोडपाली, कळंबोली आणि कामोठेतील रहिवाशांची अनेक वेळा मोर्चे-आंदोलने झाली; मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रदूषणाविरोधात खारघर, रोडपाली, कळंबोली परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. दरम्यान, तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सकाळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

वायुप्रदूषणाच्या वाढत्या त्रासामुळे तळोजाकरांनी लढा तीव्र करण्याचा संकल्प केला आहे. या लढ्याची सुरुवात तळोजा वसाहत मॅरेथॉनने होणार आहे. याबाबतची एक बैठक नुकतीच घेण्यात आली असून खारघर कॉलनी फोरम, तळोजा कॉलनी फेडरेशन, संत श्री सेवालाल महाराज सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, विविध सोसायटीचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.


तीव्र लढ्याचा संकल्प
तळोजावासीयांना वाढत्या प्रदूषणामुळे होणारा त्रास, उद्भवणारे आजार या विषयावर काही सदस्यांनी मत व्यक्त करून प्रदूषणाविरोधात तीव्र लढा देण्याचा संकल्प या वेळी केला. या बैठकीला अर्जुन गरड, प्रसाद पाटील, विकास वैरागर, अफरोज शेख, दिलीप जाधव, प्रबोध कुमार, हरी चंद्रपाल, सतीश राठोड, स्वप्नील घाटकर, अतुल पाटील यांच्यासह विविध सोसायट्या, मंडळ आणि संस्थेचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, रहिवाशांना मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मॅरेथॉन कमिटीच्या वतीने करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Motegaonkar Viral Video : पेपर फोडणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्या... शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘जशी स्वामींची इच्छा!’ गश्मीर महाजनी देऊळ बंद 2 मध्ये दिसणार? मोहन जोशी म्हणाले...'सगळे राघव शास्त्रीबद्दल...'

LSG vs RR: ३८ चेंडूत ९३ धावा... वैभव सूर्यवंशीने वादळी खेळीसोबतच ३ मोठे विक्रमही केले; रिषभचा ८ वर्षे जुना रेकॉर्डही मोडला

Swimming Record: शेतकरी कुटुंबातील कन्येची भरारी! आंबेगावची १३ वर्षीय विधी भोरची ऐतिहासिक कामगिरी; ४२ किमी जलतरण ७ तासांत पूर्ण..

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

SCROLL FOR NEXT