digha sakal
मुंबई

Digha Railway Station: दिघा स्थानकाचे आता पुन्हा होणार नामकरण!

Thane : आता फक्त लोकार्पणाची प्रतीक्षा असताना दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या नावावरून पुन्हा वादंग सुरू झाला आहे. सध्या स्थानकामध्ये दिघा नावाची पाटी लावण्यात आली होती. आहे.

सकाळ डिजिटल टीम

Digha Railway Station: नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वारावर निर्माणाधीन असणाऱ्या दिघा येथील रेल्वे स्थानकाच्या नावाचा तिढा अखेर सुटला आहे. मराठी, हिंदी, इग्रंजी अशा तिन्ही भाषांमध्ये नामफलकांचा प्रवेशद्वार लावण्यात आलेला आहे.

पण हिंदीमध्ये दीघा गांव या नावामध्ये बदल करून दीघा गाँव असा बदल करावा, अशा सूचना सेंट्रल रेल्वेने एमआरव्हीसीला दिल्या आहेत. त्यामुळे प्रवेशद्वारासह दिघागांव रेल्वे स्थानकात लावलेले फलक पुन्हा बदलावे लागणार आहेत.

दिघा रेल्वे स्थानक कामाला प्रत्यक्षात २०१७ मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली होती. अठरा महिन्यामध्ये रेल्वे स्थानकांचे काम देखील होणार होते. पण या रेल्वे स्थानकांच्या कामामध्ये तांत्रिक आणि लॉकडाऊनमुळे कामगार नसल्याने अडचणींचा डोंगर निर्माण झाला होता. उद्घाटनानंतर तब्बल सात वर्षानंतर दिघा गाव रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे.

आता फक्त लोकार्पणाची प्रतीक्षा असताना दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या नावावरून पुन्हा वादंग सुरू झाला आहे. सध्या स्थानकामध्ये दिघा नावाची पाटी लावण्यात आली होती. पण केंद्राकडून दिघा या नावाला मंजूरी दिल्यामुळे नावामध्ये बदल करण्यास सांगितले होते. त्यांनतर दिघा गांव असे स्थानकाचे नाव करण्यात आले आहे. पण हिंदीमध्ये दिघा गाँव बोलले जात असल्याने पुन्हा फलक बदलण्यात येणार आहे.

स्थानकाच्या नावावरून श्रेयवादाची लढाई
- माजी खासदार संजीव नाईक यांच्या कार्यकाळामध्ये दिघा रेल्वे स्थानक बनवण्यासंदर्भात विषय पटलावर आला होता. पण २०१४ मध्ये राजन विचारे खासदार झाल्यानंतर त्यांनी दिघा रेल्वे स्थानकांचा विषय मार्गे लावण्यात यश आले. विचारे यांनी दिघा रेल्वे स्थानकांच्या जागेत बदल करत ठाणे-बेलापूर मार्गाच्या जवळ स्थानक उभारण्याचे निश्चित केले.


- दिघा स्थानकांच्या लोकार्पणापूर्वीच राजकीय रंग चढू लागला आहे. स्थानकांच्या लोकार्पणावरून वांदग सुरु असून स्थानक सुरु करण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे. तर खासदार राजन विचारे यांनी स्थानकांत स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत दिघागांव रेल्वे स्थानकावरून श्रेयवादाची लढाई होणार असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

SCROLL FOR NEXT