Uddhav thackeray faction symbol flaming torch mashal history connection to shivsena and balasaheb thackeray  
मुंबई

Navi Mumbai: कामठ्यात ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर

सकाळ डिजिटल टीम

कामोठे शहरातील शिवसेनेच्या एका गटाचा स्नेहमेळावा नुकताच माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात पार पडला. या मेळाव्याला ठाकरे गटाचे जिल्हा तसेच शहरप्रमुख उपस्थित नसल्यामुळे विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामोठ्यात सुरू असलेल्या गटातटाच्या राजकारणाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कामोठे विभागात ठाकरे गटात धुसफूस सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, समाजमाध्यमांवर एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे विरोधकांचे आव्हान परतून लावण्यापेक्षा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. अशातच जिल्हाप्रमुख शिरीष घरत आणि जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांच्यातच शीतयुद्ध सुरू झाल्यामुळे पनवेल तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेत दोन गट तयार झाले असल्याचे दिसून आले.

कामोठेत रविवारी (ता. ७) सायंकाळी झालेल्या स्नेहमेळाव्यात दोन गटांमधील हा वाद समोर आला आहे. या मेळाव्याला जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, निरीक्षक वैभव सावंत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, माजी पदाधिकारी उपस्थित होते; पण ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शहरप्रमुख राकेश गोवारी गैरहजर असल्याने चर्चा रंगली आहे.


कामोठे विभागात सुरू असलेले गटातटाचे राजकारण खपवून घेणार नाही. काही पदाधिकारी मनाला वाटेल तसे वागत आहेत. मात्र, मेळाव्याला उपस्थित असलेलेच खरे शिवसैनिक आहेत.
- बबन पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख, ठाकरे गट


इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या काही लोकांनी मेळावा ठेवला होता, ते चुकीचे आहेत. मेळावा शिवसेना, शेकाप की भाजपचा हे नक्की समजले नाही. या मेळाव्याचे नियोजन करताना विश्वासात घेतले नसल्याने कामोठे शहरप्रमुख तसेच पदाधिकारी गैरहजर होते.
- शिरीष घरत, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निदा खान गर्भवती आहे की नाही? मुंबईत तपासणी, मेडिकल सर्टिफिकिट आलं समोर

CSK विरूद्धच्या सामन्याआधी काव्या मारनच्या SRH चा मोठा निर्णय! स्टार खेळाडूला दिली संघात एन्ट्री

Latest Marathi News Live Update: भोंदू अशोक खरातला चौथ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; SITचा पुढील कारवाईचा प्रयत्न

रिलीजपूर्वीच स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेचा हिंदी रिमेक ! प्रोमो हुबेहूब पण भलत्याच चॅनेलवर होणार प्रसारित

Pune Crime : रात्रभर शटर बंद, आत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह! प्रेमसंबंधावरून पत्नीसह अल्पवयीन मुलीनं सेक्रेटरीचा केला खून; भाजपच्या विधी अध्यक्षांसह कुटुंबाला अटक

SCROLL FOR NEXT