Navi Mumbai sakal
मुंबई

Navi Mumbai: ठाणा नाक्यावर अपघातांची मालिका सुरुच; रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष

CD

पनवेल शहराच्या प्रवेशावरील खांदेश्वर रेल्वे पुलाजवळचे वळण दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. या वळणावर पनवेलमधून बाहेर पडताना वारंवार अपघात घडत असल्याने रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष धोकादायक ठरत आहे.

पनवेल शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे मार्गावर पनवेल शहराच्या प्रवेशद्वार खांदेश्वर रेल्वे पुलापूर्वी ठाणानाका परिसरात तीव्र वळण आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पलटी होण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाकडून सुरक्षेसाठी लोखंडी रेलिंग बसवण्यात आलेले आहेत.

परंतु, आठवड्यातून एकदा या ठिकाणी अवजड वाहन पलटी होत असल्याने वाहनाच्या वेगापुढे रेलिंगचा टिकाव लागत नसल्याने वारंवार नवीन रेलिंग लावावे लागत आहे. या ठिकाणी वळण असल्याचा एक छोटा दिशादर्शक सोडला तर कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही, या दिशादर्शक फलाची दृष्यमानता खूप कमी आहे. तसेच या वळणावरच मोठा जाहिरात फलक लावल्याने वाहनचालकाचे लक्ष विचलित होत आहे.

गार्डन हॅाटेलसमोरील वाहतूक सिग्नलनंतर लगेच वळण लागते. या ठिकाणचा वाहनचालक वेगाने पुढे नेतो. परंतु, दोनशे मीटरवर लगेच तीव्र वळण असल्याने वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटतो. या ठिकाणी घडलेल्या अपघाताची संख्या पाहता सिग्नल संपल्यानंतर या ठिकाणी गतिरोधक किंवा रम्ब्लर लावण्याची गरज आहे.


- पनवेल महापालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वार असल्याने या ठिकाणी भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या अपघातातील अपघातग्रस्त वाहन थेट पालिकेच्या आवारात पडण्याची शक्यता निर्माण आहे. ठिकाणी अपघात नियंत्रण, वाहतुकीसंदर्भात तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

जुन्या मुंबई-पुणे मार्गावर काम करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ उपाययोजना करण्यास सांगणार आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक ते उपाययोजना करण्यात येतील.
- शैलजा पाटील, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT