मुंबई

विक्रमगड येथे बिरसा मुंडा युवा महोत्सव

CD

विक्रमगड, ता. १७ (बातमीदार) : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम व लार्सन ॲण्ड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जे. व्ही. गोकल ट्रस्ट यांच्या सहकार्याने विक्रमगडमधील पाटीलपाड्यातील आमराई हॉल येथे बिरसा मुंडा युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली आणि बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम, सभापती यशवंत कनोजा यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. किशोरवयीन मुला-मुलींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा महोत्सव पार पडला. या वेळी त्यांना वयानुसार आरोग्यविषयक होणारे बदल याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात अल्पवयीन माता किंवा अल्पवयीन पिता होण्याचे प्रमाण अधिक आहे, हे प्रमाण कमी व्हावे आणि भविष्यात होणारे बाल मृत्यू, मातामृत्यू रोखणे या प्रमुख उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. दीपाली फरगडे यांनी पोषण आहार व आरोग्य, तर डॉ. त्रिझना यांनी मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT