Ram Mandir esakal
मुंबई

Ram Mandir: पालघरमध्ये भगवे झेंडे, मफलरची मागणी वाढली!

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा

Ram Mandir: अयोध्येत रामलल्लाच्या स्वागताची भव्य तयारी देशात होऊ लागली आहे. पालघर जिल्ह्यातही उत्सवाचे स्वरूप काही दिवसांपासून सुरू झाले आहे. भगवे झेंडे, मफलर, पताके व रोषणाईचे दिवे, तेल, पणत्या, सुवासिक अगरबत्तीसह पूजेच्या साहित्याला मागणी आली आहे. परिणामी जिल्ह्यातील व्यापाराला तेजी आली.

पालघर जिल्ह्यातील सुमारे ७०० मंदिरात सोमवारी (ता. २२) रामनामाचा गजर ऐकू येणार आहे. पालखी सोहळा, सार्वजनिक ठिकाणी मिरवणूक, याचबरोबर विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्यातच शेकडो वाहनांवर आतापासूनच भगवे झेंडे लावले गेले आहेत. पताक्यांनी मंदिर व गावागावातील परिसर सुशोभित करण्यात आला आहे.

मफलर खरेदीसाठी नागरिक दुकानात गर्दी करू लागले आहेत. अयोध्येत जाता येणे शक्य नसल्याने नजीकच्या मंदिरात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. तसेच घरोघरी राम नामस्मरण करून पूजा-अर्चा होणार आहे. यासाठी लागणारे पूजेचे साहित्य, विद्युत रोषणाई, पणत्या आदींनादेखील बाजारात मागणी वाढली आहे.

श्रीरामाचे छायाचित्र, ठळक अक्षरात नाव असलेले भगव्या रंगाचे झेंडे, भगव्या पताका बाजारात मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भव्य राम महोत्सव साजरा करण्यासाठी बाजार मंडईत हे साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होणार आहे.

मंदिरात रोषणाई व पताक्यांची सजावट
मंदिरासमोरील दीपमालेला तेलाचे दिवे लावून सजवले जाणार आहे. मंदिर परिसरात चौफेर पताके लावण्यात येत आहेत. याचबरोबर पूजा व अभिषेकाची तयारीदेखील करण्यात आली आहे. आता २२ तारखेची प्रतीक्षा मंदिर प्रशासन करत आहे.

तेलाची मागणी वाढली
दिव्यांनी मंदिर, घर परिसर उजळून निघणार आहे. त्यामुळे दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाला मागणी वाढू लागली आहे. मंदिर प्रशासनासह नागरिकदेखील तेल खरेदीकडे वळू लागले आहेत.

मफलर आणि भगव्या झेंड्यांना मागणी वाढली; मात्र पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे दुकानात उपलब्ध नाही. पुरवठ्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे, तर पताकेदेखील संपू लागले आहेत. नव्याने मागविण्यात आले आहेत. अयोध्येतील सोहळा जिल्ह्यात साजरा करण्यासाठी खरेदीला वेग आला आहे.
- संजय अच्छीपालिया, पूजा साहित्य विक्रेता

अगरबत्ती, कापूर आणि पूजेच्या इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली आहे. प्राणप्रतिष्ठा दिनी अनेक मंदिरांत व घरी धार्मिक उपक्रम होणार आहेत. त्यामुळे पूजेचे साहित्य खरेदी केले जात आहे. कापूर व सुवासिक अगरबत्तीचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.
- विजयकुमार शर्मा, पूजा साहित्य दुकानदार


सजावटीचे दर (रुपयांत)
छोटे भगवे झेंडे ८० ते १००
मोठे भगवे झेंडे ९०० ते १२००
मफलर १००
पणत्या ६० रुपये डझन
१०० फूट पताके १०० ते १५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहोळना दिला, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; शिंदेंना शब्द दिल्यानं धंगेकर गप्प, काय घडलं?

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये, कधी जाणून घ्या?

Solapur News: आकडे पाहून सगळेच म्हणाले, आँ एवढा पाऊस कधी झाला?; मदतीसाठी बहाद्दरांनी पाडला १९९ मि.मी. पाऊस..

Solapur Accident: 'पाच कार एकमेकांवर आदळून विचित्र अपघात'; गर्भवती महिला जखमी; सोलापूर पुणे महामार्गावर घटना..

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT