panvel News mumbai  sakal
मुंबई

Sakal Impact: नवी मुंबईच्या ठाणानाक्यावरील ‘त्‍या’ वळणावर रेलिंगचे काम सुरू!

CD

Sakal Impact: पनवेल शहराच्या प्रवेशावरील खांदेश्वर रेल्वे पुलाजवळचे वळण दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. या वळणावर पनवेलमधून बाहेर पडताना वारंवार अपघात घडत आहेत. याकडे रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्‍याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत होती. याप्रकरणी ‘सकाळ’च्या (ता. १७) अंकात ‘ठाणा नाक्‍यावर अपघातांची मालिका’ या मथळ्याखाली बातमी छापून आली होती. याची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून या ठिकाणी नवीन रेलिंग बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.


पनवेल शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे मार्गावर पनवेल शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्‍या खांदेश्वर रेल्वे पुलापूर्वी ठाणा नाका परिसरात तीव्र वळण आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पलटी होण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाकडून सुरक्षेसाठी लोखंडी रेलिंग बसवण्यात आलेले आहेत, परंतु आठवड्यातून एकदा या ठिकाणी अवजड वाहने पलटी होत आहेत

त्‍यामुळे येथील रेलिंग तुटलेल्‍या अवस्‍थेत आहेत; मात्र प्रशासनाकडून नवीन रेलिंग लावण्यात येत नसल्‍याने वाहनचालकांकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत होती. याप्रकरणी ‘सकाळ’च्या (ता. १७) अंकात ‘ठाणा नाक्‍यावर अपघातांची मालिका’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची रस्‍ते विकास महामंडळाने दखल घेतली असून संबंधित ठिकाणी नवीन रेलिंग लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (Sakal Impact)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT