digha sakal
मुंबई

Mumbai Local : सविधे अभावी दिघा गांव रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

सकाळ डिजिटल टीम

ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली, ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान असणाऱ्या दिघागाव रेल्वे स्थानकांचा नुकतेच लोकापर्ण करण्यात आले आहे. एमआरव्हीसीकडून बांधण्यात आलेल्या या स्थानकांचे आयत्यावेळी उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातील सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.


ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान असणारे वाशी, तुर्भे, सानपाडा, ऐरोली, रबाळे, घणसोली रेल्वे स्थानक हे सिडकोने बांधले असून त्यांची देखभाल ही सिडकोकडून करण्यात येत आहे. पण दिघा स्थानक मात्र हस्तांतरीत झाले नसल्याने रेल्वे बोर्डाकडूनच स्थानकातील पार्किंग, शौचालये तसेच स्टेशन परिसराची स्वच्छता केली जात आहे. पण त्याची पूर्वतयारी रेल्वेने फक्त दोनच कर्मचाऱ्यांकडून स्थानक परिसरामध्ये स्वच्छता केली जात आहे. पण हे स्थानक खुले असल्याने या परिसरामध्ये धुळीचे प्रमाण जास्त आहे.

तिकीट काढताना दमछाक
- दिघागाव रेल्वे स्थानकातील सेवा अद्याप पूर्णक्षमतेने कार्यरत झालेले नाहीत. सध्या दिघागाव रेल्वे स्थानकांमधून कुर्ला जायचे असल्यास वाया ठाणे मार्गे तिकिट मिळते. पण वाशी मार्गी जायचे असल्यास वाशी पर्यंतच तिकिट देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना वाशीला जाऊन पुन्हा तिकिट काढावे लागत असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
- रेल्वे बोर्डाकडून स्थानकांच्या उत्तर व दक्षिणेस असणाऱ्या तिकीट खिडक्यांपैकी फक्त दक्षिणेकडे असणारी एकच खिडकी सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी तिकिटासाठी धावपळ करावी लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

उपहारगृहाची व्यवस्था होणार
ट्रान्स हार्बर मार्गावरील कोणत्याच रेल्वे स्थानकाच्या फलाटावर उपहारगृह नाही. कारण ही स्थानके सिडकोकडे आहे. पण यामध्ये रेल्वे, सेंट्रल रेल्वेमध्ये असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर उपहारगृहाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे दिघागाव रेल्वे स्थानक रेल्वेकडे असल्याने या स्थानकांमध्ये उपहारगृहाची सोय उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

SCROLL FOR NEXT