Aditi Tatkare esakal
मुंबई

Aditi Tatkare: मंत्री अदिती तटकरेंकडून नगरोली-पोटणेर येथे विकास कामाचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

Aditi Tatkare: माणगाव तालुक्यामधील इंदापूर विभागातील पोटणेर ग्रुप ग्रामपंचायतीमधील नगरोली येथील सामाजिक सभागृहाचे, तसेच येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


यावेळी अदिती तटकरे यांनी बोलताना सांगितले की, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. आपण घेतलेला निर्णय व आम्हाला दिलेला शब्द हे आम्ही कधीच खाली पडू देणार नाही. गावात अधिकाधिक विकास कामे कशी होतील याचा निश्चितप्रमाणे आमच्याकडून प्रयत्न व प्रथम प्राधान्य दिले जाईल.

खासदार सुनील तटकरे असतील, मी असेन, आम्ही निवडणुकांचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कधीच काम करत नाही. आम्हाला मतदान न करणारी अशी अनेक गावे आहेत; त्यांनी आम्हाला विकासकामांसाठी विनंती केली; त्या गावाच्या विकासासाठीदेखील आम्ही निधी देऊन विकासकामे केली असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.

तसेच पोटणेर येथे प्रख्यात मराठी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या नावाने महिलांसाठी कार्यशाळा बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शेखर देशमुख, महाराष्ट्र राज्य युवक सचिव दीपक जाधव, उदय अधिकारी, नगरोली महिला मंडळ तसेच पोटणेर ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT