navi mumbai  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: चोरांच्या दहशतीने रात्री तरुणांकडून जागता पहारा; उरण परिसरात गावांची सुरक्षा धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

Uran Crime: औद्योगिकीकरण वाढल्याने उरण शहरासोबत उरण ग्रामीण भागातील परिसराचा आवाका दिवसागणिक वाढत आहे. शहरासोबतच तालुक्यातील ग्रामीण भागांत परप्रांतीय नागरिक नोकरी-धंद्यानिमित्ताने राहण्यास आल्याने गावांच्या लोकसंख्येतदेखील वाढ होत आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येसोबतच गावांची सुरक्षा धोक्यात आली असून उरण परिसरातील ग्रामीण भागात घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने गावोगावी जागता पहारा देण्याची वेळ तरुणांवर आली आहे.

उरण शहरासोबतच नजीकच्या गावातदेखील बाजारपेठा विस्तारित झाल्या आहेत. औद्योगिकीकरणामुळे सध्या उरण शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात घर भाड्याने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उरण परिसरात सध्या परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने स्थिरावत आहेत; पण वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वाहनांचे पार्ट चोरी करणे, घरफोड्या करणे असे प्रकार सर्रास होत असून काही टोळ्या ग्रामीण भागात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कष्ट करून मेहनतीने तसेच हप्त्यांवर घेतलेले सोने-नाणे चोरीला जात असल्याने मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आल्याने चोरांच्या या दहशतीविरोधात ग्रामस्थांनीच गावाच्या सुरक्षेचा निश्चय केला आहे.

समाजमाध्यमांवर आवाहन
उरण परिसरात चिरनेर, कळंबुसरेप्रमाणे सारडे गावातील तरुणांकडून जागता पहारा दिला जात आहे. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्ती, फेरीवाले यांना गावात फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय समाजमाध्यमांवरदेखील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देताना काहीही संशयास्पद आढळल्यास तातडीने माहिती देण्याचे संदेश फिरत आहेत.
----------------------------------------------------
सद्यस्थितीत उरण परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या चोरांना अटकाव घालण्यासाठी गावातील तरुणाई रात्रीच्या वेळी जागता पहारा देत आहे. जेणेकरून चोरांपासून गावाचे संरक्षण होईल.
- रोशन पाटील, सरपंच, सारडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT