nanded
nanded sakal
मुंबई

Thane Crime: मातेची फसवणूक करून दीड महिन्याच्या बाळाची केली खरेदी; वाचा काय आहे छत्तीसगड कनेक्शन?

Chinmay Jagtap

Thane Crime: मातेची फसवणूक करून दीड महिन्याच्या बाळाची खरेदी झाल्याची घटना ठाण्यात नुकताच उघडकीस आली आहे. याप्रकरणी खरेदी विक्रीचा व्यवहार घडवून आणणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, बाळाची खरेदी करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली होती, परंतु तो आता जामीनावर बाहेर आहे.

येथील आनंद दिघे टॉवरमध्ये राहणाऱ्या कमल पंजाबी याला बाळ दत्तक घ्यायचे होते. त्यासाठी तुषार साळवे आणि भूमिका या दोघांनी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई या महिलेशी संपर्क साधला. लक्ष्मीबाईने तेथे राहणारे एक गरीब कुटुंब हेरले. अतिशय दरिद्री परिस्थिती असल्यामुळे त्या कुटुंबाला पैशांची गरज होती. हे ओळखून लक्ष्मीबाईने बाळाच्या आईला दोन लाख रुपयांची लालुच दाखवून बाळ दत्तक देण्यास राजी केले.

बाळाच्या आईने ठाण्यात येऊन पैशाच्या बदल्यात बाळ सुपूर्द केले. पण, छत्तीसगडला आपल्या घरी परतल्यानंतर तिची सासु आणि पतीने याबाबत विचारणा केली. तसेच याचा विरोध केला. त्यामुळे बाळाचे आई-वडील दोघे बाळ परत घेण्यासाठी ठाणे येथे आले. येथे आल्यावर त्यांनी टिळक नगर पोलिसांकडे दाम्पत्याने याबाबत तक्रार केली.

हे प्रकरण ठाणे पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली सरोदे यांनी तपास सुरू केला. अवघ्या ४८ तासांत लक्ष्मी, भूमिका, तुषार साळवे आणि कमल पंजाबी यांना अटक करण्यात आली तसेच, बाळाची सुटका करून छत्तीसगडमधील दाम्पत्याला पैसे परत मिळवून दिले. यातील आरोपी कमल पंजाबी जामीनावर असून लक्ष्मी, भूमिका आणि तुषार हे कारागृहात आहेत.

बाळाची रवानगी सध्या जननी आशीष बालक आश्रमात करण्यात आली आहे. पोलिस उप आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुख, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली सरोदे यांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: विंडिजविरुद्ध PNG च्या सेसे बाऊचं विक्रमी अर्धशतक, तर रसेलचा IPL नंतर वर्ल्ड कपमध्येही गोलंदाजीत जलवा

Loksabha Election Result : भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला; मतमोजणीसंदर्भात केल्या या 'चार' मागण्या

BJP President : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा अध्यक्ष बदलणार; 'या' तीन नावांची आहे चर्चा

Lok Sabha Election Result : सत्ता आल्यास पहिल्या १०० दिवसात काय करणार? लोकसभेच्या निकालापूर्वी PM मोदींची अधिकाऱ्यांसोबत खलबतं

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT