vande bharat  esakal
मुंबई

Railway News: ‘वंदे भारत ट्रेन' होणार आणखी फास्ट; प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

Railway News: मुंबई ते अहमदाबाद या स्थानकांदरम्यान धावणारी ‘वंदे भारत’ सुपरफास्ट एक्स्प्रेस ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणार आहे. याकरिता रुळांची क्षमता आणि इतर कामे करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली. त्यासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा खर्चही करण्यात येणार आहे.

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून विविध शहरांदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. या एक्स्प्रेसला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या ‘वंदे भारत’ची ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी त्या क्षमतेचे रेल्वे रूळ नसल्याने अनेक विभागांत ९० ते ११० किमी वेगाने ती चालवावी लागते.

त्यामुळे या एक्स्प्रेसच्या गतीवर प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली. याची दखल घेत पश्चिम रेल्वेनेगाड्यांच्या वेग वाढविण्यासाठी रेल्वे मार्गांचे अद्ययावतीकरण करण्याबरोबरच सिग्नल यंत्रणाही सक्षम केली आहे.

भारतीय रेल्वेने ‘मिशन रफ्तार’ योजनेंतर्गत ‘वंदे भारत’चा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळांची वेगमर्यादा क्षमता आणि इतर बाबींच्या अद्ययावतीकरणासाठी तब्बल तीन हजार ९५९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

NEET Paper Leak Case: मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाने कुणाचा नंबर? संशयास्पद संवाद सीबीआयच्या हाती

Pune NCP BJP MLC : पुणे विधानपरिषदेच्या जागेवरुन रस्सीखेच, राष्ट्रवादी -भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे; भाजप नेत्यांने आकड्यांचा खेळ मांडला

India’s Fastest Man! भारताच्या गुरविंदरवीर सिंगने १०.०९ सेकंदात पार केले १०० मीटरचे अंतर; राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेचे तिकीट मिळवले

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT