Mumbai Pollution sakal
मुंबई

Navi Mumbai Pollution: वायू प्रदूषणामुळे खारघरवासीयांची झोपमोड; होत आहे डोकेदुखी आणि इतर त्रास

navi mumbai khargar the residents are expressing their anger as many people lost sleep due to the strong smell released in the air

CD

खारघर गेल्‍या काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी होणारे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले होते.

मात्र पुन्हा बुधवारी रात्री पूर्वीप्रमाणे हवेत सोडला जाणाऱ्या उग्र वासामुळे अनेकांची झोपमोड झाल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय यामुळे अनेकांना डोकेदुखी, मळमळ झाल्‍याचेही सांगण्यात येत आहे.

तळोजा एमआयडीसीमधून रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या रसायनांचा उग्र वास आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होऊ लागल्‍याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य प्रदूषण महामंडळ, तसेच लोक आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून विविध सामाजिक संस्था प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन करीत आहे.

मध्यंतरी हा उग्र वास कमी झाला होता. दरम्‍यान, कॉलनी फोरम आणि तळोजा हाऊसिंग फेडरेशनकडून येथील प्रदूषणाच्या विरोधात तळोजा वसाहतीमध्ये मॅरेथॉन आयोजित केली होती. याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

येथील प्रदूषणाच्‍या विरोधात तळोजावासीय असताना, पुन्‍हा बुधवारी रात्री अचानक उग्रवास येण्यास सुरुवात झाली. त्‍यामुळे अनेकांची झोपमोड झाली. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT